चुलत भावाच्या शेतातील आंब्यांच्या झाडाला तरुणाने घेतला गळफास! नांदुरा तालुक्यातील धक्कादायक घटना

 
fhgjhk
नांदुरा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चुलत भावाच्या शेतातील आंब्यांच्या झाडाला २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदुरा तालुक्यातील पातोंडा येथे काल,८ मे रोजी सकाळी उघडकीस आली. वैभव विठ्ठल गिरी (२२, रा.पातोंडा, ता. नांदुरा) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वैभवने त्याचा चुलतभाऊ शिवचरण दिंगबर गिरी याच्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. शेजारच्या शेतकऱ्यांनी ही बाब शिवचरण गिरी यांना कळवली. घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नांदुरा येथे पाठविण्यात आला.

याप्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतक वैभवच्या पश्यात आई ,वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे. वैभवने आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप समोर आले नव्हते.