पाणी भरतांना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू! जानेफळ हळहळले
Mon, 30 May 2022

जानेफळ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पाणी भरण्यासाठी मोटार लावत असताना विजेचा धक्का लागल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल, २९ मे रोजी मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे घडली. हरीश श्याम सदावर्ते(२५, रा.जानेफळ, ता. मेहकर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार गावात नळ आल्याने हरीश पाणी भरण्यासाठी मोटार लावत होता. यावेळी घाईगडबडीत त्याला विद्युत शॉक लागला . घरच्यांच्या लक्षात येताच त्याला तातडीने गावातीलच खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला मेहकर येथे हलविण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. हरिशला ४ बहिणी असून त्या विवाहित आहेत. निर्व्यसनी असलेल्या हरिशला व्यायामाची आणि खेळाची प्रचंड आवड होती . हरिशच्या अचानक जानेफळ गावावर शोककळा पसरली आहे.