आत्महत्या करायला त्याने का केली देऊळगाव राजा तालुक्यातील "या" गावाची निवड? ६४ किमी वरून आला..

 
fashi
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  देऊळगांव राजा तालुक्यातील पिंपळगाव राजे (चिलमखा) शिवारात  जालना जिल्ह्यातील रामनगर येथील ३५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना  आज,२० डिसेंबरला सकाळी उघडकीस आली. माधव सिताराम साबळे (३५,रा. रामनगर जि.जालना) असे मृतकाचे नाव आहे.

याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला मर्ग दाखल करण्यात आला. पिंपळगाव राजे (चिलमखा) येथील पोलीस पाटील अनिल भगवान खरात यांनी फिर्याद दिली. ते स्वतःच्या घरी असताना सरपंच दीपक पवार यांनी फोन द्वारे कळवले की, पिंपळगाव राजे (चिलमखा)  शिवारात भंडारी यांच्या शेतामध्ये लिंबाच्या झाडाला अज्ञात इसमाने गळफास घेतल्याचे सांगितले. घटनास्थळावर मृतकाच्या खिशामध्ये आधार कार्ड व पॅन कार्ड मिळाले. त्यावरून गळफास घेतलेले मृतक माधव सिताराम साबळे(३५,रा. रामनगर, जि. जालना) येथील असल्याचे समजले. त्यांनी त्यांच्या गावापासून ६४ किमी दुर अंतरावरील शिवारात येऊन गळफास का घेतला?  याचा तपास पोलीस करीत आहेत.