महालक्ष्मी पूजनाचे साहित्य घेऊन घरी जात असताना कुत्रा आडवा आला! दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

 
fgfdfg
 चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महालक्ष्मी पूजनाचे साहित्य घेऊन घरी जात असताना कुत्रा आडवा असल्याने  अपघात होऊन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सिंदखेड राजा तालुक्यातील सावखेड तेजन गावाजवळ ही घटना घडली. अपघातात ठार झालेले अशोकराव भानुदास पडघान हे चिखली तालुक्यातील मेरा बु येथील रहिवासी आहेत.
भानुदास पडघान हे मलकापूर पांग्रा येथे महालक्ष्मी पूजनाचे साहित्य आणण्यासाठी गेले होते. घराकडे परत जात असताना सावखेड गावाजवळ त्यांच्या मोटार सायकलला कुत्रा आडवा येऊन धडकला. त्यामुळे मोटार सायकल रोडवर आदळली.त्यात अशोकराव पडघान  यांच्या डोक्याला जबर मार लागला. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांनी त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात हलविले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मेरा बु गावात या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.