दुचाकी चोरीला ब्रेक कधी? बाईकचोर अडकला LCB च्या जाळ्यात..!

 
ujyh
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शहरासह जिल्हाभर दुचाकी चोरीला जाण्याचे सत्र सुरूच आहे. मात्र सिंदखेडराजा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अशा प्रकारचा गुन्हा रोखला. पेट्रोलिंग दरम्यान  संशय बळावल्याने पोलिसांनी काल रात्री दुचाकीसह आरोपीला ताब्यात घेतले आहे. शेख जावेद शेख अहमद रा. जाम नाका, परभणी असे आरोपीचे नाव आहे.

सिंदखेडराजा पोलिस हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची रात्रपाळीची गस्त सुरू होती. दरम्यान सावखेड फाटा येथे नाकाबंदी करीतअसताना, आरोपी वाहन चेक करीत असल्याचे दिसून आले. पोलिसांचा संशय वाढल्याने त्याची चौकशी करण्यात आली. वाहनाची कागदपत्र नसल्याने आणि एमएच २१ एजी ७०६६ क्रमांकाचे हिरो होंडा पॅशन- प्रो हे वाहन चोरी गेल्याचे सिंदखेडराजा पोलीस स्टेशन मधून निष्पन्न झाले. दरम्यान पोलिसांनी आरोपीला दुचाकीसह ताब्यात घेऊन त्याच्याकडील ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे हेड कॉन्स्टेबल ओम प्रकाश साळवे, एनपीसी दिगंबर कपाटे, पीसी दीपक वायाळ, पीसी मनोज खर्डे यांनी केली.