चिखलीच्या पुजा सोबत जे झालं तेच देऊळगाव माळीच्या राधिकासोबत! गळफास घेऊन संपवले जीवन! ८ महिन्यांची चुमकली झाली पोरकी

 
pppp
मेहकर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या महिन्यात चिखलीच्या संभाजीनगरात पुजा गायकवाड या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.पैशासाठी छळणाऱ्या सासरच्या जाचाला कंटाळून पुजाने टोकाचा निर्णय घेतला होता. दरम्यान मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथेही तशीच घटना उजेडात आली असून २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. राधिका पवन खेत्री (२२) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

 याप्रकरणी पोलिसांनी राधिकाच्या पतीसह सासरकडील पाच जणांना अटक केली आहे. दीड वर्षाआधी राधिकाचा विवाह पवन खेत्री याच्यासोबत झाला होता.मात्र विवाह झाल्यानंतर तिला सासरी सुख मिळत नव्हते. राधिकाला सतत माहेर वरून पैसे आण असा तगादा लावण्यात येत होता. याशिवाय राधिकाच्या नवऱ्याचे बाहेर अफेयर होते. त्यामुळेही तो तिच्याशी विचित्र वागायचा असे तक्रारीत म्हटले आहे. 
तिचा प्रचंड शारीरिक व मानसिक छळ सासरच्या लोकांनी केला. अखेर या त्रासाला कंटाळून तिने जगाचा निरोप घेतला. मनमिळावू स्वभावाच्या राधिकाने टोकाचे पाऊल उचलल्याचे परिसरात हळहळ व्यक्त होत असून समाजमन सुन्न झाले आहे.