सकाळी शौचाला गेली अन् गावाशेजारच्या विहिरीत घेतली उडी! भरोसा येथे २३ वर्षीय विवाहितेची आत्महत्या! आज सकाळची घटना

 
iugi
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २३ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आज,६ ऑगस्ट रोजी सकाळी चिखली तालुक्यातील भरोसा येथे ही खळबळजनक घटना घडली.  स्वाती परमेश्वर थुट्टे ( रा.भरोसा) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे.
 

प्राप्त माहितीनुसार स्वाती चे ३ वर्षाआधी लग्न झाले होते. तिला १ वर्षांची मुलगी आहे. तिचे माहेर जाफ्राबाद तालुक्यातील सोनगिरी आहे. आज, ६ ऑगस्ट रोजी सकाळी ती शौचासाठी घराबाहेर पडली. बराच वेळ होऊनही ती घरी न परतल्याने तिचा शोध सुरू केला.

दरम्यान गावाशेजारी गट न २६ मध्ये दुर्गादास लक्ष्मण शिवरकर यांच्या विहिरीच्या काठावर तिच्या चपला दिसून आल्याने गळ टाकून विहिरीत शोध घेण्यात आला. त्यावेळी गळात अडकून स्वातीचा मृतदेह बाहेर आला. घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील प्रक्रिया सुरू आहे.