जप्त केलेल्या गुटख्याचे पोलीस काय करत असतील बरं..जाणून घ्यायचय? चिखली पोलिसांनी वाचा काय केले..!

 
uyhfyt
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली पोलिसांनी जप्त केलेला १० लाखांचा प्रतिबंधित गुटखा आज २२ डिसेंबर रोजी नगर परिषदेच्या डंम्पिंग ग्राउंडवर जाळून नष्ट केला.

jyh

वर्ष २०२१- २२ मध्ये प्रतिबंधित गुटख्याचे जवळपास ३० गुन्हे चिखली पोलिसांनी दाखल केले होते. यामध्ये जवळपास १० लाख रुपयांचा प्रतिबंधित सितार, वाह, राजनिवास, विमल, बाजीराव मस्तानी, नजर, रोकडा आदी प्रकारचा गूटख्याचा समावेश होता. सदर गुटखा हा पोलीस विभागाच्या चिखली येथील मालखाण्यात ठेवण्यात आला होता.सदर गुटख्यामुळे दुर्गंधी पसरु नये म्हणून पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी मा. न्यायदंडाधिकारी यांना पत्र व्यवहार करून जप्त केलेला गुटखा नाश करण्याची परवानगी मागितली होती. त्यांच्या परवानगीने २२ डिसेंबर रोजी नागपूर - औरंगाबाद हायवेवरील  नगर परिषदेच्या डम्पिंग ग्राउंडवर संध्याकाळी ५ वाजेदरम्यान प्रतिबंधित गुटखा जाळून नष्ट करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक लांडे, एपिआय प्रवीण तळी,एएसआय शशिकांत धारकरी व पो. कॉ विनोद ब्राम्हणे उपस्थित होते.