अकोला गाजवणारे विलास पाटील आता चिखलीचे प्रभारी ठाणेदार! एसपी आवाड यांनी दिली जबाबदारी

 
Ttyy

चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  चिखली पोलीस ठाण्याच्या ठाणेदार पदावर कुणाची नेमणूक होते याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. जिल्हा पोलीस अधीक्षकांना एकही अधिकारी मिळत नाही का असा प्रश्न देखील चर्चिल्या जात होता. या चर्चेला तात्पुरता विराम मिळाला असून, चिखलीच्या ठाणेदारपदाचा अतिरिक्त कारभार पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. महिनाभरापूर्वी अकोला येथून  बुलडाणा येथील नियंत्रण कक्षात त्यांची बदली झाली होती. आता ते चिखली पोलीस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी तत्पूर्वी अनेक पोलीस निरीक्षकांना तात्पुरती पदस्थापना दिली आहे. परंतु चिखली पोलीस ठाण्याला ३० डिसेंबर पासून ठाणेदार मिळालेला नव्हता.२५ दिवसापासून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल बारापात्रे ठाण्याचे प्रभारी ठाणेदार म्हणून कामकाज पहात होते. दरम्यान चिखली पोलीस ठाण्याला ठाणेदार का मिळत नाही? अशी चर्चा सुरू होती.

या चर्चेला विराम मिळाला असून,चिखली ठाणेदार पदी पोलीस निरीक्षक विलास पाटील यांची प्रभारी नेमणूक करण्यात आली आहे. या संदर्भातील पत्र जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी २४ जानेवारीला निर्गमित केले आहे. विलास पाटील यांनी अकोला जिल्ह्यातील अतिशय वर्दळीच्या सिटी कोतवाली पोलिस ठाण्याचा कारभार यापूर्वी सांभाळला आहे. अकोल्यातील त्यांचा कार्यकाल चांगलाच गाजला होता. दरम्यान तत्पूर्वी बुलडाणा  येथेही लाचलुचपत प्रतिबंधक विभागातही विलास पाटील कार्यरत होते.