शेगावच्या सराफा व्यापाऱ्यावर पोलीस कोठडीत अनैसर्गिक बलात्कार ! एपीआय आणि २ पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश

 
kkkk
शेगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अकोला एलसिबीने शेगावच्या एका सराफा व्यापाऱ्याला अटक केल्यानंतर त्याच्यावर पोलीस कोठडीत अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला होता. याप्रकरणात अखेर एलसीबीचा तत्कालीन एपिआय नितीन चव्हाण, २ पोलीस कर्मचारी शक्ती कांबळे, संदीप काटकर यांच्यासह दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.


   सहा महिन्यांपूर्वी चोरीचे सोने विकत घेतले म्हणून अकोला एलसीबीने शेगावच्या सराफा व्यावसायिकाला अटक केली होती. त्यानंतर पोलीस कोठडीत आपल्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप सराफा व्यावसायिकाने जामिनावर सुटल्यावर केला होता. पोलिस कर्मचाऱ्यांनी पोलीस कोठडीत असणाऱ्या अन्य एका आरोपीला सराफा व्यावसायिकावर अनैसर्गिक बलात्कार करायला लावला होता. सराफा व्यावसायिकाने याप्रकरणाची तक्रार अकोल्याच्या सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात व जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे दिली होती. मात्र अपेक्षित कारवाई न झाल्याने व्यावसायिकाने न्यायालयात धाव घेतली. आता अखेर न्यायालयानेच गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने पोलिसांना गुन्हे दाखल करावेच लागणार आहेत.