दुर्दैवी! भिंत अंगावर पडल्याने बांधकाम कामगाराचा मृत्यू; बुलडाणा तालुक्यातील भादोल्याची घटना
Oct 14, 2022, 17:56 IST

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भिंत अंगावर पडल्याने बांधकाम कामगाराचा जागीच मृत्यू झाला. आज, १४ ऑक्टोबरला बुलडाणा तालुक्यातील भादोला येथे ही घटना घडली. अण्णासाहेब जगदेव मिसाळ (४०, रा. भादोला) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार अण्णासाहेब मिसाळ हे रामभाऊ आप्पा व्यवहारे यांच्या घराचे बांधकाम करीत होते. त्याचवेळी निर्माणाधिन भिंत त्यांच्या अंगावर कोसळल्याने ते भिंतीखाली दबले. त्यांना तातडीने बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले . त्यांच्या पश्यात दोन मुलं, एक मुलगी, पत्नी, आई असा परिवार आहे. बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.