UPDATE मृतदेह बाहेर काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या शोध पथकातील तरुणाचाही गाळात फसून मृत्यू; पत्नीला कार शिकवतांना कार कोसळली विहिरीत; मृतकांची संख्या झाली ३ ;

नव्वद फूट विहिरीत ८० फूट पाणीच पाणी; कार तळाशी, पाणी उपसण्यासाठी लावले पंप..

 
hgf
देऊळगाव राजा( टीम बुलडाणा लाइव्ह): पत्नीला कार शिकवत असताना नियंत्रण सुटल्याने भरधाव कार विहिरीत कोसळल्याची घटना आज, ३ नोव्हेंबरच्या दुपारी देऊळगाव राजा चिखली रोडवर घडली होती. दरम्यान कार मधून शिक्षक पती कसाबसा बाहेर पडला मात्र पत्नी आणि चिमुकलीला तो वाचवू शकला नाही. दरम्यान या प्रकरणी आणखी एक अपडेट माहिती समोर आली असून मृतदेहांचा शोध घेण्यासाठी विहिरीत उतरलेल्या शोधपथकातील तरुणाचा गाळात फसून मृत्यू झाला आहे. पवन पिंपळे(३०, रा.पोस्ट ऑफिस जवळ, देऊळगाव राजा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

jhg

 देऊळगाव राजा चिखली रोडवरील देऊळगाव राजा जवळच हॉटेल विजय वाईन बार जवळ दुपारी दोनला हा अपघात झाला. प्राप्त माहितीनुसार देऊळगाव राजा शहरातील रामनगर भागात राहणारे अमोल मुरकुटे  हे त्यांची पत्नी स्वाती मुरकुटेला कार शिकवीत होते. त्यांच्यासोबत त्यांची पाचव्या वर्गात शिकणारी मुलगी सिद्धी मुरकुटे ही सुध्दा होती. दरम्यान चिखली रोडवरील हॉटेल विजय वाईन बार जवळ कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या ९० फूट खोल विहिरीत कोसळली. यावेळी अमोल मुरकुटे  हे कसेबसे खिडकीतून बाहेर आले मात्र पत्नी आणि मुलीला ते वाचवू शकले नाहीत. घटनेची माहिती मिळताच देऊळगावराजा पोलिसांनी व महसूल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे.  अमोल मुरकुटे यांना रुग्णालयात दाखल केले असून पत्नी व मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्याची प्रक्रिया दुपारपासून सुरू आहे.

दरम्यान विहिरीत पाणी भरपूर असून कार विहिरीच्या तळाशी असल्याने मृतदेह बाहेर काढण्यात बाधा निर्माण होत आहे. असे असताना साडेचारच्या सुमारास देऊळगाव राजा  पवन पिंपळे हा शोधपथकातील तरुण दोरीच्या सहाय्याने विहिरीत उतरला. मात्र जवळपास  दीड तास झाला तरी तो अद्याप बाहेर आलेला नाही. त्यामुळे तो गाळात फसल्याचे बोलल्या जात आहे. विहिरीतून पाणी उपसण्यासाठी तीन पंप लावण्यात आले असून आणखी पंप लावण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. घटनास्थळी तहसीलदार धनमने यांच्यासह देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जयवंत सातव व पोलीस कर्मचारी ठाण मांडून आहेत.