दोन मोटारसायकली समोरासमोर धडकल्या; एक जण जागीच ठार, दोन गंभीर; संग्रामपूर तालुक्यातील घटना

 
hvjh
 संग्रामपुर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भरधाव जाणाऱ्या दोन मोटारसायकली समोरासमोर धडकल्याने एक जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. पातूर्डा ते वरवट बकाल मार्गावरील  नेकनामपूर फाट्याजवळ ही घटना घडली. शेख तसलीम शेख नादु (रा. तेल्हारा, जि अकोला) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे.
 या अपघातात शेख रिजवान शेख इरफान व शेख इम्रान शेख इरफान ( रा. कवठळ) हे जखमी झाले आहेत. नेकनामपूर फाट्याजवळ अपघात झाल्यानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी शेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र शेख तसलीम याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघां गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी खामगावला हलविण्यात आले आहे.