दोन दुचाकींची समोरासमोर धडक! एक ठार,तिघे गंभीर! नांदुरा - जळगाव जामोद रस्त्यावर झाला अपघात

 
nhghhf
नांदुरा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने १ जन ठार तर तिघे गंभीर जखमी झाले. काल, २३ नोव्हेंबरच्या संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास नांदुरा ते जळगाव जामोद रस्त्यावर हा भीषण अपघात झाला.

नांदुरा जळगाव जामोद रस्त्यावरील नवी येरळी गावाजवळ दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या. एका दुचाकीवर दोन मित्र जळगाव जामोद कडून नांदुऱ्याकडे तर दुसऱ्या दुचाकीवरून पती पत्नी नांदुऱ्याकडून जळगाव जामोद कडे जात होते. दरम्यान जळगाव जामोद वरून नांदुऱ्याकडे येणाऱ्या दुचाकीवरील आकाश भीमराव अबगड (२५) याचा मृत्यू झाला तर त्याच दुचाकीवरील त्याचा मित्र भरत खंडारे गंभीर जखमी झाला. दुसऱ्या दुचाकीवरील पती पत्नी सुंदरसिंग राजपूत व सुरेखा राजपूत हेसुद्धा गंभीर जखमी झाले असून जखमी झालेल्या तिघांना उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे.