बोलेरो, टँकर अन् दुचाकीचा तिहेरी अपघात! शेगावला दर्शनासाठी जात असलेले ८ महिला भाविक जखमी! चिखली - खामगाव रोडवरील भीषण अपघात

 
trh6
खामगाव( भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेगावकडे निघालेली बोलेरो , टँकर व दुचाकीचा तिहेरी अपघात होवनू ८ महिला भाविक जखमी झाल्याची घटना आज १ सप्टेंबर रोजी सकाळी चिखली- खामगाव रोडवरील माथणी फाट्याजवळ घडली . जखमींना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. 

संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील काही भाविक ऋषीपंचमीनिमित्त आज बोलेरोने शेगावकडे जात होती . दरम्यान  त्यांची बोलेरो एक टँकर व दुचाकी या वाहनांमध्ये तिहेरी अपघात झाला. यामध्ये बोलेरोमधील भाविक द्वारकाबाई भास्कर सोनोने (३३), छाया  सिताराम वाकडे (३५), अनिता सोपान मोरे (३०) मुक्ता भगवान मोरे (३८) ,सोनाली कारभारी सोनोने (३०), वच्छलाबाई दशरथ साळुंके (५०), ब्रिजलाबाई उत्तम वाकोडे (५०), रुकमा पप्पुलाल मोरे (४०, सर्व रा . गवळी धानोरा ता . गंगापूर जि. संभाजीनगर) हे जखमी झाले आहेत.

सर्व जखमींना त्वरित उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. या अपघातात दुचाकी चालक देखील जखमी झाला आहे त्याला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.