दुःखद ब्रेकिंग! नाशिकच्या बस अपघातात बुलडाणा जिल्ह्यातील दोघींचा बळी! बिबी वरून रात्री साडेअकराला बसले होते गाडीत! तिघे सुदैवाने वाचले

 
hgh

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  संपूर्ण  महाराष्ट्रासाठी आज, ८ ऑक्टोबरचा दिवस काळा दिवस ठरलाय.. लक्झरी बस आणि टँकरची धडक झाल्यानंतर बसने पेट घेतला. या भीषण अपघातात वृत्त लिहिस्तोवर  १२ जणांचा जळून मृत्यू झाला असून ३८ प्रवाशी गंभीररीत्या भाजले आहेत. आज पहाटे सव्वापाच वाजेच्या सुमारास नाशिकजवळ संभाजीनगर रोडवर हॉटेल मिरची  समोर ही दुर्दैवी घटना घडली. चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस यवतमाळ वरून मुंबईकडे जात होती. दरम्यान या अपघातात बुलडाणा जिल्ह्यातील दोघींचा बळी गेला असल्याचे समोर आले आहे. बिबी येथील लक्ष्मीबाई नागुराव मुधोळकर (५०) व त्यांची नात कल्याणी आकाश मुधोळकर (३) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

        जाहिरात 👇

ghube

दोघी काल रात्री साडेअकराला बिबी येथून चिंतामणी ट्रॅव्हलच्या लक्झरी बस मध्ये बसल्या होत्या.याशिवाय मेहकर येथून बसमध्ये बसलेले तिघे सुखरूप असल्याचे वृत असून नातेवाईकांचे त्यांच्याशी बोलणे झाल्याचे जिल्हा प्रशासनातील आपत्ती विभाग प्रमुख संभाजी पवार यांनी बुलडाणा लाइव्ह शी बोलताना सांगितले. रेयान पठाण, भागवत भिसे, विशाल पतंगे अशी सुखरूप वाचलेल्या तिघांची नावे आहेत. 

मृतकांना ५ लाख...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेत मदत कार्याचा आढावा घेतला आहे. अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्यांवर शासकीय खर्चातून उपचार केले जाणार असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

टँकर नाशिकवरून पुण्याकडे जात होता. बस आणि टँकरची धडक झाल्यानंतर बस ६० फूट पुढे घसरत गेली तर टँकर ९० मीटर पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला थांबला. यानंतर काही क्षणात बसने पेट घेतला. प्रवाशी झोपेत असल्याने अनेकांना नेमके काय झाले ते कळले नाही. काही प्रवाशांनी गाडीच्या काचा फोडून उद्या मारून जीव वाचवला, ज्यांना बसच्या बाहेर निघणे शक्य झाले नाही अशा १२ जणांचा बससोबत जळून कोळसा झाला. जखमी असलेल्या ३८ जणांवर सध्या  उपचार सुरू आहेत.