दुःखद ब्रेकिंग! आयशर ऑटोचा भीषण अपघात; पाच जण ठार; बुलडाणा तालुक्यातील माळवडींच्या एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश!

 
kihu
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काही दिवसांआधी नाशिक जवळ लक्सरी बस पेटल्याने प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यात बुलडाणा जिल्ह्यातील दोघींचा समावेश होता. काल, १६ ऑक्टोबरला बोथा घाटात झालेल्या बस आणि दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. काल, रात्री केळवद फाट्यावर झालेल्या अपघातात एक जण ठार झाला होता. अपघाताचे हे सत्र अजून थांबले नसून आज, जालना जिल्ह्यातील माहोरा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

ऑटो आणि आयशरचा हा अपघात झाल्याचे सूत्रांनी सांगितले. अपघातात ठार झालेले कुटुंब बुलडाणा तालुक्यातील माळवंडी येथील राहणारे आहे. याच अपघातात आणखी एक जण ठार असून तो देऊळगाव राजा येथील आहे. जाफ्राबाद भोकरदन रस्त्यावरील माहोरा  येथील आर.एम जिनिंग जवळ हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच जाफ्राराबाद पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पुढील कारवाई सुरू केली आहे. ठार झालेल्यांमध्ये माळवंडी येथील राजू भिकन शहा याची पत्नी, २ मुली, सासु आणि साला यांचा समावेश आहे.
 हे वृत्त टीम बुलडाणा लाइव्ह कडून अपडेट करण्यात येत आहे. अपघाताची अधिक माहिती याच बातमीत वाचकांना थोड्या वेळात देण्यात येईल..