कर्जाला कंटाळला शेतकरी ! विष प्राशन करून संपवले जीवन! देऊळगाव राजा तालुक्यातील धोत्रा नंदई ची घटना

 
ygu
देऊळगाव राजा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन करून जीवन संपवले. देऊळगावराजा तालुक्यातील धोत्रा नंदई येथे ही घटना घडली. समदा पंजाजी नागरे असे आत्महत्या करणाऱ्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे.

समदा नागरे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे  एक ते दीड एकर शेती आहे. मात्र सततची नापिकी आणि त्यातून वाढत्या कर्जामुळे ते चिंतेत होते.  १० सप्टेंबर रोजी त्यांनी विष प्राशन केले. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपचारासाठी  देऊळगाव मही येथील येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जालना येथे रेफर करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान १३ सप्टेंबरला त्यांनी शेवटचा श्वास घेतला.