कर्जाला कंटाळला शेतकरी! शेवटी त्यानेही तेच केलं..!! मेहकर तालुक्यातील बदनापुरची घटना
Sep 10, 2022, 12:57 IST

मेहकर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नापिकी आणि कर्जबाजारी पणाला कंटाळून मेहकर तालुक्यातील बदनापूरच्या युवा शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज, १० सप्टेंबर रोजी सकाळी गी घटना उघडकीस आली. गणेश मारुती आसोले(४०, रा.बदनापूर, ता.मेहकर) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार गणेश आसोले यांच्याकडे ३ एकर शेती असून त्यावरच ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र सततची नापिकी, शेतीचा वाढता खर्च यामुळे अपेक्षित उत्पन्न येत नसल्याने त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर वाढत गेला. त्यामुळे ते नैराश्यात होते. त्यामुळे कुटुंबातील सर्वजण झोपेत असताना रात्री दोन ते तीनच्या सुमारास त्यांनी गावाशेजारील गोंधनाच्या झाडाला गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतक शेतकरी गणेश आसोले यांच्या पश्यात पत्नी आणि २ मुले असा परिवार आहे.