कर्जबाजारीपणाला कंटाळला बिबीचा शेतकरी!गळफास घेऊन संपवले जीवन..

 
fdh
बिबी( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गळफास घेऊन कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केली. आज, १० नोव्हेंबरला लोणार तालुक्यातील बिबी येथे ही घटना उघडकीस आली. नारायण बबन साळवे(४५) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

 बिबी येथील अभय चव्हाण  यांच्या शेतातील बांधावर असलेल्या झाडाला त्यांनी गळफास घेतला. सकाळी साडेआठला ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच बिबी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. मृतक  साळवे यांच्या पश्यात पत्नी, तीन मुली व १ मुलगा असा परिवार आहे. तपास ठाणेदार तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ दिनेश चव्हाण करीत आहे.