मोबाईल शॉपीचे शटर तोडून साडेतीन लाखाचा मुद्देमाल लंपास! चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद ; देऊळगाव मही येथील घटना, पोलीस पेट्रोलिंगची गरज

जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात चोरी, घरफोडीचे गुन्हे वाढत आहेत. दिवसा रेकी करून रात्री चोरटे संधी साधून लाखोंचा मुद्देमाल गडप करीत आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणेला रात्रीची पेट्रोलिंग वाढवण्याची गरज आहे. गस्त नियमित होत नसल्याने देऊळगाव मही येथे चोरट्यांनी मोबाईल दुकानचे शटर तोडून साडेतीन लाखांची चोरी केली.
कमलेश मोबाईल शॉपीमध्ये असलेले आयटेल कंपनीचा स्मार्टफोन किंमत ७ हजार रुपये,सॅमसंग कंपनीचे मोबाईल ५ नग किंमत ९ हजार २०० रुपये, सेल कोअर कंपनीचे मोबाईल २० नग किंमत २६७०० रुपये, नोकिया कंपनीचे मोबाईल साहित्य १० नग किंमत १६५००, लावा कंपनीचे ६२ नग किंमत ७६ हजार ३५० रुपये, ब्लूटूथ १० नग किंमत १३ हजार रुपये, आयपीएलचे साधे मोबाईल ५५ नग किंमत ८४ हजार १०० रुपये, कनेक्ट कंपनीच्या स्मार्ट वॉच १५ किंमत ४२ हजार रुपये,रियल मी कंपनीच्या स्मार्ट वॉच किंमत १२ हजार रुपये, इयर बर्ड ५ नग ९६०० रुपये, लावा कंपनीचे चार्जर २२ नग किंमत ४४००, १२ पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड आणि इतर साहित्य किंमत ३० हजार रुपये, लावा कंपनीचे मोबाईल साधे ८ नग किंमत १३ हजार ६०० रुपये, दुकानच्या गल्ल्यातील नगदी रोख रक्कम १३५०० रुपये असा एकूण ३ लाख ५८हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. सदर घटना सकाळी उघडकीस आल्याने व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली. सदर घटनेची फिर्याद दुकान चालक संजय पारसमल कोठारी यांनी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला दिली. या अज्ञात चोरट्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक जयवंत सातव करीत आहेत.