चोरट्यांचा रात्रीस खेळ चाले! एकाच रात्री दोन घरे फोडली; सिंदखेडराजा तालुक्यातील घटना!

 
sdf
सिंदखेडराजा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा तालुक्यातील महारचिकना गावात ३० एप्रिलच्या रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. दोन घरात घरफोडी करून १ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. बिबी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महारचिकना येथील शिवानंद जनार्दन कायंदे हे अंत्यसंस्कारासाठी बाहेरगावी गेले होते तर उद्धव किसन ढाकणे हे शेतात गेलेले होते. दोघांच्या घरी कुणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांचा खेळ जमवला. शिवानंद कायंदे यांच्या घरातील एलइडी टिव्ही, सोन्याचे दागिने तर उध्वव ढाकणे यांच्या घरातील ८० किलो गहू व २० हजार रुपयांची रोकड लंपास केली . महारचिकना गावात गेल्या काही दिवसांत चोरीच्या तीन घटना घडल्या आहेत. सातत्याने होत असलेल्या चोऱ्यांमुळे पोलीसांचा धाक राहिला की नाही असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.