चोरांनो शाळा त सोडा रे..! मेहकर तालुक्यातील शाळेत चोरी! काय काय चोरल वाचा...!!

 
dongav
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. अनेक गावांमध्ये छोट्या - मोठ्या चोऱ्या होत असून काही गावांत तरुणांनी गस्त घालण्यासाठी पथके तैनात केली आहे. दरम्यान डोणगाव जवळील बेलगांव येथील शाळेत अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. 

 डोणगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेलगांव येथील महादजी दर्योजी पाटील या शाळेतील डीव्हीआर, सीपीयू, युपीएस, मॉनिटर, स्पिक माईक, राऊटर, शालेय रेकॉर्ड, शिक्षकांचे पगार पत्रक, विद्यार्थ्यांची हजेरी पट असा एकूण ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. तपास डोणगाव पोलीस करीत आहेत.