कर्तव्यावरील सैनिकाच्या घरात भरदिवसा चोरट्यांनी केला हाथ साफ! चिखली शहरातल्या श्रीकृष्ण नगरातील घटना

 
chikhlipolis
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा); भारतीय सैन्य दलात कर्तव्यावर असणाऱ्या सैनिकाच्या  कुलूपबंद घरातील चोरट्यांनी जवळपास 58 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल भरदिवसा लंपास केल्याची घटना चिखली येथे समोर आली आहे.

पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती नुसार, कृष्णनगर चिखली येथे संदीप लेंडे यांचे घर असून ते सध्या सियाचीन येथे आपले कर्तव्य बजावत आहे. 13 डिसेंबर रोजी त्यांचा 12 वर्षीय मुलगा व 16 वर्षीय मुलगी हे नेहमीप्रमाणे सकाळी 8 वाजता शाळेत गेले. व त्यांची पत्नीही मुलांच्या शाळेत गेल्यानंतर जवळच असलेल्या आईच्या घरी पारायण सुरू असल्याकारणाने घराला कुलूप लावून तिथे गेल्या. दुपारी दोन वाजेदरम्यान त्यांचा मुलगा शाळेतून घरी आला तेव्हा त्याने पाहिले की, घराचे कुलूप तुटलेले असून घरातील साहित्य आत्याव्यस्त स्थितीत पडलेले आहे. त्याने लगेच ही माहिती आपल्या आईला जाऊन सांगितली असता, मुलाची आई व मामा यांनी घरात प्रवेश केल्यानंतर त्यांना मुद्देमाल लंपास झाल्याचे दिसून आले.अज्ञात चोरट्या विरुद्ध चिखली पोलिसांनी भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 380, 454 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

 दागिने व रोकड लंपास

 15 वर्षा पुर्वीचे जुने वापरतील सोन्याचे गंठण वजन अंदाजे 10.5 ग्रम, अं 24000 व सोन्याची एक लांब पोत वजन अंदाजे 10.5 ग्रम  अं.24000 रुपये व पर्स मध्ये ठेवलेले 10500 रू नगदी असे एकूण 58500 रुपयांचे मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.