त्‍यांनी मला पाप लावले... विवाहितेची जलंब पोलीस ठाण्यात धाव!

 
महिलेचा छळ
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मुलगी झाल्यानंतर २७ वर्षीय विवाहितेचा छळ मांडला. माहेरावरून पैसे आणण्यासाठी मारहाण केली. तिला पाप लावून घराबाहेर निघण्याससुद्धा मनाई केली. तिचे वडील तिला माहेरी घेऊन गेले. तीन महिन्यांपासून ती माहेरी राहतेय. अखेर जलंब पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिने तक्रार केली आहे. त्‍यावरून पोलिसांनी तिच्या पतीसह सासू, सासरा, दीर, नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जलंब येथील विवाहितेचे पासला (ता. मेहकर) येथील सासर असून, तिचे लग्न २५ मार्च २०१८ रोजी झाले होते. तिला तीन वर्षांची मुलगी आहे. मात्र मुलगी झाल्यापासून सासरच्यांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली. १८ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी पासला येथे घरी असताना पतीने तुझ्या नातेवाइकांकडून पैसे का आणले नाही असे म्‍हणून तिला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली.

त्‍यावेळी तिला दिवस गेलेले होते. तिने वडिलांशी संपर्क करण्याचा प्रयत्‍न केला असता घराबाहेरसुद्धा जाऊ दिले नाही. तिला पाप लावले. सासूने वडिलांकडून पैसे आण असे म्‍हणून शारीरिक व मानसिक छळ केला. तिच्या वडिलांनी तिला माहेरी नेले. त्‍यानंतर नणंद व दीराने शिविगाळ करून वडिलांना शिविगाळ केली.