बैल धुण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू! चार महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!मोताळा तालुक्यात पोळ्याला गालबोट

 
duble
मोताळा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पोळा सणानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना  मोताळा तालुक्यातील कुऱ्हा गोतमारा गावात घडली.

काल सकाळी पोळा सणानिमित्त २४ वर्षीय शुभम ईश्वरसिंग घोती हा तरुण बैल धुण्यासाठी तलावावर गेला होता. बैल धुत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो गाळात फसला. ही बाब इतर शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्याला बाहेर काढून तातडीने बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले,मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

ईश्वरचे चार महिन्याआधीच लग्न झाले होते. अर्ध्यावरच बहरलेल्या संसाराचा डाव मोडल्याने कुऱ्हा गावावर शोककळा पसरली. बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.