बायकोला ९ दिवस खोलीत कोंडून ठेवले आणि खोलीत सोडले २ साप! बायकोच्या बापाची शेती नावावर करून घेण्यासाठी नवऱ्याच्या कारनामा! बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात विवाहितेची तक्रार

 
saap
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाण्याच्या लेकीचा तिच्या सासरी अकोल्यात प्रचंड छळ करण्यात आला.  माहेरवरून  पैसे आण असे म्हणत नवऱ्यासह सासरच्यांनी तिला प्रचंड छळले. नवरात्रीत नऊ दिवस तिला बंद खोलीत कोंडण्यात आली. ती घाबरली पाहिजे ,घर सोडून निघून गेली पाहिजे म्हणून तिच्या खोलीत दोन सापाचे पिल्ले सोडण्यात आले. काल, ६ स्पटेंबर रोजी विवाहितेने बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार दिली आहे.

बुलडाणा येथील विदर्भ हाउसिंग सोसायटी येथे माहेरी आलेल्या सौ. मनीषा कमलेश लाड (३६) यांनी याप्रकरणाची तक्रार दिली. २०१९ मध्ये अकोल्याच्या मोठी उमरी भागात राहणाऱ्या कमलेश लाड  याच्याशी त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर लगेच हुंड्यासाठी मनीषा यांचा छळ सुरू करण्यात आला. तुझ्या बापाकडे भरपूर शेती आहे, २-३ एकर माझ्या नावावर करायला लाव असा तगादा नवरा तिच्याभोवती लावत होता. ५ लाख हुंडा व १० तोळे सोने घेऊन ये तरच मी तुला वागवतो असे म्हणत नवरा तिला मारहाण करू लागला. दरम्यान  २०१९ च्या नवरात्री दरम्यान सासरच्या लोकांनी मनिषाला एका खोलीत कोंडून ठेवले व त्या खोलीत २ सापाचे पिल्ले आणून सोडल्याचा आरोप मनिषाने तक्रारीत केला आहे.

दरम्यान लग्नानंतर काही महिन्यांतच ४ जानेवारी २०२० रोजी मनिषाला नवऱ्याने व सासऱ्यांची घराबाहेर काढून दिले. त्याआधी तिच्या अंगावरील दागिने काढून घेतले. तेव्हापासून ती बुलडाणा येथे माहेरी येथे राहत आहे. अनेकांनी समजूत काढण्याचा प्रयत्न होऊनही तिचा नवरा तिला नांदवायला तयार नसल्याने तिने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी नवरा कमलेश लाड याच्यासह सासू ,सासरे, दिर, नणंद अशा ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.