ट्रक पलटी! चेंदामेंदा होऊन एकाचा मृत्यू,एक गंभीर! चिखली खामगाव रोडवरील पेठ जवळील घटना

 
jbjh
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ट्रक पलटी झाल्याने ट्रकखाली दबून एकाचा चेंदामेंदा झाल्याने त्याचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. चिखली खामगाव रोडवरील पेठ घाटात ही घटना घडली.

 लक्ष्मण रमणकोटा (२३) असे अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव आहे.तर त्याच सहकारी सामद भाई हरजन भाई(४३) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. दोघेही गुजरात राज्यातील देवभूमी द्वारका येथील रहिवासी आहेत. मालवाहू ट्रक घेऊन चिखलीकडे येत असताना निष्काळजी पणे ट्रक चालविल्याने ट्रक पेठ घाटात पलटी झाला.

त्यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. घेटनेची माहिती मिळताच अमडापुर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आली.