मुरूम वाहतूक करणारे टिप्पर उलटले! चालकाचा जागीच मृत्यू! खामगाव जलंब रोडवरील घटना

 
bbhjj
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : रस्ता कामासाठी मुरुमाची वाहतूक करणारे एक टिप्पर उलटल्याने २५ वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू झाला. काल दुपारच्या सुमारास खामगाव जलंब रोडवरील  माक्ता - कोक्ता येथे ही घटना घडली. विरेंद्र डांगे(२५) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव असून मजुरीसाठी तो मध्यप्रदेशातून आला होता.

खामगाव चांगेफळ रस्ता विस्तारीकरणाचे काम काही दिवसांपासून सुरू आहे. रस्ता निर्मितीच्या कामासाठी मुरूम वाहून नेणाऱ्या  टिप्परच्या चालकाचे नियंत्रण सुटले.त्यामुळे भरधाव टिप्पर नाल्यात उलटले. यात वीरेंद्र टिप्पर खाली दबल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीसाठी त्याचा मृतदेह खामगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला . खामगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.