तिघांनी चोरली एक बकरी! वाईट कृत्यासाठी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल! नांदुरा तालुक्यातील घटना

 
tfhgbnm
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नांदुरा तालुक्यातील टाकली वतपाळ येथे तिघांनी मिळून एका शेतकऱ्याची बकरी चोरून नेली. शेतकऱ्याला संशय आल्याने शेतकऱ्याने नांदुरा पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली. पोलिसांनी चोरीचे वाईट कृत्य करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
 टाकळी वतपाळ येथील ज्ञानेश्वर संतोष धामोडे (२६) यांची बकरी चोरीला गेली होती. ही बकरी हरसोडा (ता. नांदुरा) येथील श्रीकृष्ण गुरू कासारे व टाकळी वतपाळ येथील विलास त्र्यंबक अहिर व रवी सुपडा कवरे यांनी सगंनमताने चोरल्याचा संशय ज्ञानेश्वर धामोडे यांनी तक्रारीत व्यक्त केला. तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास नांदुरा पोलीस करीत आहेत.