मेव्हणा राजाच्या शंकराच्या मंदिरावर आढळला शिक्षकाचा मृतदेह! रात्रीपासून होते बेपत्ता! देऊळगावराजा तालुक्यात खळबळ

 
fyt
देऊळगावराजा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगाव राजा तालुक्यातील मेव्हणा राजा येथील शंकराच्या मंदिरावर आज, १० सप्टेंबर रोजी शिक्षकाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. पुंजाराम बर्डे(४०, रा.मेहुणा राजा, ता. देऊळगाव राजा)  असे मृतक शिक्षकाचे  नाव आहे. ते देऊळगाव राजा येथील नगरपरिषद शाळा क्र २ येथे कार्यरत होते.

 प्राप्त माहितीनुसार पुंजाराम बर्डे काल रात्री घराबाहेर पडले. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. दरम्यान सकाळी गावातीलच शंकराच्या मंदिरावर पूजा करण्यासाठी गेलेल्या पुजाऱ्याला पुंजाराम बर्डे यांचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच देऊळगाव राजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.  पुंजाराम बर्डे यांचा मृत्यू का झाला ? हा घातपात आहे की नैसर्गिक मृत्यू याबाबतचा तपास सुरू आहे. पुंजाराम बर्डे यांच्या पश्यात एक मुलगा, तीन मुली, पत्नी, आई, वडील असा परिवार आहे.