शेगावातल्या मोकाट कुत्र्यांनी हद्दच पार केली हो..! घरात झोपलेल्या वृद्धासोबत वाचा काय केलं!

 
jhgy
शेगाव ( सोनू मोहोड:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  शेगाव शहरातील टेकडी परिसरात मोकाट कुत्र्यांचा, डुकरांचा चांगलाच हैदोस वाढलाय. नागरिक या मोकाट कुत्र्यांच्या त्रासाला वैतागलेत. आज, २८ ऑक्टोबरच्या पहाटे तर कुत्र्यांनी हद्दच पार केली. घरात झोपलेल्या श्यामराव शेळके यांच्यावर हल्ला करून त्यांच्या ओठाचा लचका तोडून त्यांना गंभीर जखमी केले.

श्यामराव शेळके यांना नागरिकांनी उपचारासाठी शेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथे हलविण्यात आले. दरम्यान टेकडी परिसरात सध्या माणसे कमी आणि मोकाट जनावरे, कुत्रे जास्त झालेत. कराच्या रूपात नगरपालिका प्रशासन इथल्या नागरिकांकडून कर वसूल करीत असली तरी या भागातील नागरिकांना सुविधांपासून वंचित रहावे लागत असे. आतापर्यंत अनेक निवेदने देऊनही नगरपालिका प्रशासनाने कुठलेही पाऊल उचलले नाही असेही स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान आज, नगरपालिकेत निवेदन द्यायला गेले असता मुख्याधिकारीच नव्हते असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.