दोन समाजात तेढ निर्माण करणारे स्टेटस ठेवले! एकलाऱ्याचा तरुण बुलडाणा पोलिसांनी उचलला!

 
fhgfj
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दोन समाजात तेढ निर्माण करणारे स्टेटस ठेवल्याने एकलारा (ता.चिखली) येथील तरुणाला बुलडाणा पोलिसांनी अटक केली. आज, १६ जुलै रोजी पहाटे तीनला ही कारवाई करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार एकलारा येथील नितीन प्रल्हाद मुरकुटे याने दोन समाजात जातीय तेढ निर्माण होईल असे आक्षेपार्ह स्टेटस ठेवले होते. बुलडाणा शहरातील  इकबाल नगरातील एका तरुणाने याबाबतची तक्रार बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात दिल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत एकलारा येथून नितीन प्रल्हाद मुरकुटे याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या आगलाव्यांची पोलीस हयगय करणार नाही असा इशारा बुलडाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी दिलाय...