भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले! सुट्टीवर आलेल्या सैन्यातील जवानासह पत्नी गंभीर! ८ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू! नांदुऱ्याची घटना
Sep 19, 2022, 07:56 IST

नांदुरा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भरधाव ट्रकने दिलेल्या दुचाकीला दिलेल्या धडकेत ८ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे आई - वडील गंभीर जखमी झाले. नांदुरा येथील राष्ट्रीय महामार्गावर काल,सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. अपघातातील ठार झालेल्या चिमुकल्याचे गंभीर जखमी वडील हे भारतीय सैन्यात कार्यरत आहेत.
जाहिरात
प्राप्त माहितीनुसार दरबारसिंग डा lबेराव हे पत्नी व मुलासह नांदुऱ्याकडे जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला उडवले .या भीषण अपघातात त्यांचा मुलगा आयुष(८) याचा जागीच मृत्यू झाला. तर ते स्वतः आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले. ते जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील रहिवासी आहेत.