बचत गटाच्या महिलांना घेऊन जाणारा भरधाव ऑटो डिव्हायडर वर आदळला! एक महिला ठार; मेहकर तालुक्यातील फर्दापूर जवळील घटना

 
accident
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बचत गटाच्या महिलांना घेऊन मेहकर कडे जाणाऱ्या ऑटो चालकाचे नियंत्रण सुटल्याने ऑटो डिव्हायडर वर आदळला. या भीषण अपघातात एक महिला ठार तर एक गंभीर जखमी झाली. मेहकर तालुक्यातील फर्दापूर गावाजवळ समृध्दी महामार्गालगतच्या पुलाजवळ ही घटना घडली.

 मेहकर तालुक्यातील गोंढाळा येथील बचतगटाच्या महिला हिवरा खुर्द येथील ऑटो चालक भीमराव खरात याच्या ऑटो ने मेहकर कडे जात होत्या. दरम्यान मध्येच कुत्रा आडवा आल्याने चालक भीमराव खरात चे ऑटो वरील नियंत्रण सुटले आणि ऑटो  रस्ता दुभाजकवर आदळला . या अपघातात ज्योती ओमकार पडघान या महिलेचा मृत्यू झाला तर अन्य एक महिला गंभीर जखमी झाली तर पाच महिलांना सुद्धा किरकोळ दुखापत झाली आहे.