आरोपी शोधण्यात धाड पोलिसांचा हात अखडता! खरंच 'कानून के हाथ लंबे होते है?.."त्या" प्रकरणातील आरोपी अजूनही फरार!धाड वासियांचा प्रश्न..

 
dhad
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  धाड येथील पशुधन विकास अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी ४ पैकी १ आरोपी अद्यापही फरार असून, धाड पोलिस अद्यापही फरार आरोपींला पकडून 'कानून के हाथ लंबे होते हैं!' हे दाखवू शकले नाही. त्यामुळे धाड पोलिसांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने नुकताच आरोपींचा जामीन फेटाळला.

  बुलडाणा येथून जवळच असलेल्या धाड येथे पशुधन विकास अधिकारी नितीन डोंगरसिंह देव्हाने शासकीय कामात असताना, ४ आरोपींनी त्यांच्याशी हुज्जत घालत शासकीय कामात अडथळा निर्माण करून मारहाण केल्याची घटना घडली होती. या मारहाण प्रकरणी ४ आरोपींवर गुन्हे दाखल करून शेख अहमद अब्दुल रियाज सौदागर, मोहम्मद जावेद मोहम्मद हाफिज या २ आरोपींना २८ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील ४ आरोपींपैकी रिजवान सौदागर आरोपी १५,००० हजार रुपयांच्या बॉण्डवर बाहेर आहे. तर राजीक सौदागर हा आरोपी अद्यापही फरार आहे.

याप्रकरणी नागपूर हायकोर्टात २ जानेवारी २०२३ रोजी पुढील सुनावणी असल्याची माहिती आहे. परंतु तत्पूर्वीच बुलडाणा एलसीबी पथकाने  देशाची सीमा पार करण्यापूर्वीच सराईत गुन्हेगारांना अटक केली होती. मात्र धाड येथील फरार आरोपी धाड पोलिसांना सापडत नाही, हे समजण्या पलीकडचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. सदर आरोपीने फरार होण्यासाठी बक्कळ पैसा मोजला असावा अशी चर्चा होत आहे. परिणामी धाड पोलिसांवरील विश्वास ढळत चालला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सचिन पाटील व कर्मचारी करीत आहे. फरार आरोपीला पकडण्याचे आव्हान सध्या तरी धाड पोलिसांच्या समोर आहे.