विद्यार्थिनीची पप्पी घेणारा विकृत,वासनांध मुख्याध्यापक गजाआड! शिक्षकदिनी केला होता कारनामा

 
dha
नांदुरा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पाचव्या वर्गातील विद्यार्थिनीला अभ्यास घ्यायच्या नावाखाली खोलीत बोलावून तिच्याशी अश्लील चाळे करणाऱ्या विकृत वासनांध मुख्याध्यापकाला पिंपळगाव राजा पोलिसांनी अटक केली. नांदुरा तालुक्यातील मुरंबा गावच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षकदिनी ५ सप्टेंबरला मुख्याध्यापक  देविदास जानराव डीघोळे (५४) याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. त्याला काल, अटक करण्यात आली.

५ सप्टेंबर रोजी पीडित ११ वर्षीय विद्यार्थिनीला देविदास डीघोळे याने खोलीत बोलावले होते. तुझा अभ्यास घ्यायचा असे म्हणत तू अभ्यास का केला नाही अशी विचारणा त्याने मुलीला केली होती. त्यानंतर आता तुला शिक्षा करणार असे म्हणत मुलीच्या छातीवर वाईट उद्देशाने हात फिरवत तिला मांडीवर बसवत तिची पप्पी घेतली होती.

घडला प्रकार कुणाला सांगितल्यास जीवाने मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर ६ सप्टेंबर रोजी मुलीच्या वडिलांनी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काल, देविदास डिघोळे याला पोलिसांनी अटक केली आहे.