लपंडाव खेळता खेळता चिमुकल्यासोबत विपरीत घडलं! जगाचा घेतला कायमचा निरोप; खामगावातील हृदय पिळवटून टाकणारी घटना

 
hjbjh
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लपंडाव खेळता खेळता बाथरूम मध्ये पाय घसरल्याने चिमुकल्याची मान लटकलेल्या ओढणीत अडकली. त्याचा गळफास बसल्याने त्याचा मृत्यू झाला. खामगावच्या समर्थनगरात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. प्रणित दिलीप इंगळे (१२) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

प्रणित त्याच्या भावासोबत दुपारी दोनच्या दरम्यान घरात लपंडाव खेळत होता. लपण्यासाठी तो बाथरूम मध्ये गेला. त्याचवेळी त्याचा पाय घसरल्याने त्याची मान बाथरूममध्ये लटकलेल्या ओढणीत अडकली. त्याला गळफास बसल्याचे लक्षात येताच घरातील लोकांनी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.