कोलाऱ्यात रात्री विपरीत घडल; आगलाव्यांनी धुमाकूळ घातला! एकाच रात्री पेटवल्या तीन शेतकऱ्यांच्या सोयाबीन सुड्या; गावकरी म्हणतात देव त्यांचं आयुष्यात भल करणार नाही..

 
sudi
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात सध्या आगलाव्या, जळक्या लोकांनी धुमाकूळ घातलाय. स्वतःला काही करता येत नाही अन् दुसऱ्याचे चांगले होत असले तर ते डोळ्यांना पाहवत नाही अशी जळक्यांची वृत्ती असते. चिखली तालुक्यातील कोलारा येथे ६  नोव्हेंबरच्या रात्री या आगलाव्यांनी तीन सोयाबीनच्या सुड्या पेटवून दिल्याचे समोर आले आहे.

        thakre

              ( जाहिरात👆🏻 )

 कोलारा येथे सध्या श्री.सिध्देश्वर महाराजांची यात्रा सुरू आहे. तालुक्यातून अनेक भाविक भगवान सिद्धेश्वराचे दर्शन घेण्यासाठी कोलारा येथे येत असतात. दरम्यान गावातील नागरिक यात्रेत व्यस्त असतांना शेतशिवारात मात्र आगलावे करामती करीत होते. कोलारा येथील शेतकरी वसुदेव प्रतापसिंग सोळंकी, नारायण पिराजी सोळंकी आणि राजेंद्र तुकाराम सोळंकी या तीन शेतकऱ्यांच्या सुड्या अज्ञात आगलाव्यांनी पेटवून दिल्या. विशेष म्हणजे तिन्ही शेतकऱ्यांचे शेत वेगवेगळ्या अंतरावर आहे. त्या सुड्यांच्या आजूबाजूला असलेल्या शेतातील सोयाबीन सुड्या सुरक्षित आहेत. त्यामुळे आगलाव्यांनी हा ठरवून कार्यक्रम केल्याचे गावकऱ्यांमध्ये बोलल्या जात आहे.

यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान वृत्त लिहीस्तोवर प्रकरणाचा पंचनामा करण्यात आला नव्हता. हे आगलावे कोण आहेत, त्यांनी सुड्या का पेटवल्या,त्यातून त्यांना मिळालं तरी काय असे अनेक प्रश्न सध्या गावकऱ्यांना पडले आहे. या आगलाव्यांचे भगवान सिद्धेश्वर आयुष्यात भले करणार नाही असेही गावकरी बोलू लागले आहेत.