मासेमारी करण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा तलावात बुडून मृत्यू! देऊळगाव राजा तालुक्यातील निमखेडची घटना
Nov 14, 2022, 08:47 IST

देऊळगाव राजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मासेमारी करण्यासाठी तलावात उतरलेल्या वृद्धाचा तलावात बुडून मृत्यू झाला. देऊळगावराजा तालुक्यातील निमखेड येथे ही घटना घडली. वृद्धाचा मृतदेह काल, १३ नोव्हेंबरला तलावाबाहेर आला.
प्राप्त माहितीनुसार नेमिनाथ केसापुरे(५८) हे शनिवारी दुपारी मासे पकडण्यासाठी तलावात उतरले होते. होलोने तलावात जाळे टाकत असताना तोल जाऊन ते तलावात पडले. बराच वेळ होऊन ते पाण्याच्या बाहेर आले नाहीत, त्यांच्या चपला व कपडे तलावाच्या काठावर असल्याने ते पाण्यात बुडाले असावेत असा अंदाज कुटुंबीयांना आला. रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. पोलिसांनी घटनास्थळी पोचून पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.