बुलडाण्यात आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याचा खून! आरोपी राजीव लहाने गजाआड

 
jhb
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या दोन सहकाऱ्यांत जुन्या वादातून २५ सप्टेंबर रोजी हाणामारी झाली. या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या सुधाकर इंगोले(५०) यांचा संभाजीनगर येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून खून करणाऱ्या राजीव लहाने याला अटक करण्यात आली आहे.

 प्राप्त माहितीनुसार सुधाकर इंगोले हे सध्या लोणार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सहाय्यक अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्याआधी जे बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत होते. त्यावेळी त्यांचा सहकारी राजीव लहाने याच्यासोबत त्यांचा वाद झाला होता.

त्यामुळे २५ सप्टेंबर ला रात्री राजीव लहाने याने इंगोले यांना धाड नाक्यावर बोलावले. त्याने व त्याच्या साथीदारांनी इंगोले यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना संभाजीनगर येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान काल, त्यांचा मृत्यू झाल्याने याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून लहाने याला अटक करण्यात आली आहे.