चिखलीच्या विशालचा ८ वर्षाने मोठ्या असलेल्या विवाहितेवर जडला जीव; मात्र तिचा फोन बिझी आला अन् विपरीत घडल; प्रेयसीच्या गळ्यावर चाकूने वार!कोलारा गावची धक्कादायक घटना

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोलारा माहेर असलेल्या एका ३२ वर्षीय विवाहितेचे १५ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पतीसोबत ती चिखलीच्या टिळकनगर भागात राहत होती. तिच्या पतीच्या अन तिच्या वयात १६ वर्षाचे अंतर होते. दरम्यान तिचा पती मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. पती अधिक वेळ कामात व्यस्त असल्याने घराबाहेर रहायचा. दरम्यान याच संधीचा फायदा गल्लीत राहणाऱ्या विशाल ने घेतला. विशाल आणि विवाहितेचे अनैतिक संबंध निर्माण झाले. एका दुकानावर काम करणारा तिचा पती रात्री उशिरा घरी यायचा. त्यातच विशाल आणि विवाहितेच्या अफेयची चर्चा गल्लीत पसरली.
विवाहितेच्या पतीलाही या प्रकाराबद्दल कळल्याने त्याने विशालला जाब विचारला असता दोघांत कडाक्याचे भांडण झाले. मात्र त्यानंतरही दोघांचे लफडे सुरूच होते. अखेर वैतागून विवाहितेचा पती विवाहितेला घेऊन कोलारा येथे सासुरवाडीला राहू लागला. तिथेही दोघांचे अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. दरम्यान काही दिवसांनी विवाहितेचा फोन बिझी येत असल्याने विशाल तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. त्यावरून दोघांत वाद देखील झाले. दरम्यान काल, ९ नोव्हेंबरला विशाल कोलारा येथे गेला, प्रेयसीच्या घरात घुसला. तिथे दोघांत वाद झाल्याने विशालने चाकूने तिच्या गळ्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी चिखली पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.