बुलडाण्याच्या नायब तहसीलदाराची करामत! लग्न होऊन दीड वर्ष झाले पण काहीच केलं नाही..! बायको म्हणे हा काय कामाचा, शरीरसुख देत नाही!

 उलट बायकोच्या चारित्र्यावर घ्यायचा संशय! तहसिलदारासह ५जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

 
bbbb
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा येथे कार्यरत असलेल्या व मूळच्या नाशिक जिल्ह्यातील येवला येथील असणाऱ्या नायब तहसीलदाराचा अजबच कारनामा समोर आलाय. लग्न होऊन दीड वर्ष झाले तरी त्याने पत्नीशी शारीरिक संबंध ठेवले नाही. याउलट घरच्यांच्या सांगण्यावरून तो बायकोच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. हनिमून साठी शिमल्याला गेले मात्र तिथेही त्याने काहीच केले नाही. विवाहितेवर माहेरवरून पैसे आणण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. तिला जिवंत मारून टाकण्याची धमकी सासरच्यांनी दिली..तिला घराबाहेर हाकलले.. अखेर तिने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी तहसीलदारांसह त्याच्या कुटुंबीयाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पैठण पोलीस ठाण्यात याप्रकरणी विवाहितेने तक्रार दिलीय. लोणार गल्ली पैठण येथील २८ वर्षीय  विवाहितेचे नाशिक जिल्ह्यातील येवला येथील तरुणाशी डिसेंबर २०२० मध्ये लग्न झाले. तो सध्या बुलडाणा येथे नायब तहसिलदार म्हणून कार्यरत आहे. दरम्यान लग्नानंतर फेब्रुवारी महिन्यात विवाहात पतीसोबत शिमला येथे हनिमूनसाठी गेली होती. मात्र तिथे त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला नाही.

विवाहितेने पतीला याबद्दल विचारणा केल्यावर त्याने तिच्यावर संशय घेऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. लग्नानंतर दीड वर्ष नवऱ्याने शारीरिक संबंध ठेवलेच नाहीत असा दावा विवाहितेने तक्रारीत केला आहे. नवऱ्याला इरेक्टाईल डिसफंक्शन चा आजार असल्याने त्याला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला त्याने मात्र दुसऱ्याच डॉक्टरचे उपचार घेतले. उपचारारचा त्याच्यावर कोणताही फरक पडला नाही.

दरम्यान तिने सासू सासऱ्यांना याबद्दल सांगितले असता ते तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागले. विवाहिता डॉक्टर असल्याने क्लिनिक टाकून देण्यासाठी माहेरवरून ५ लाख रुपये आण असा तगादा तिच्याभोवती लावण्यात येत असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.  दोष तुझ्यात आहे..आमच्या मुलावर आरोप लावू नको, तुला नांदायचे असेल आमच्या सांगण्याप्रमाणे नांद असे तिच्या सासरकडील मंडळी म्हणत होती. तिला जिवे मारण्याची धमकी देऊन घराबाहेर हाकलल्याने विवाहिता मार्च २०२१ पासून माहेरी राहते. पतीच्या वागणुकीत बदल न तिने काल, २९ जुलैला पैठण पोलीस गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी विवाहितेचा तहसीलदार पती, सासरा, सासू व दोन दिरांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.