लग्न ठरले, साखरपुडा झाला पण नवरदेवाचे होते दुसऱ्याच्या बायकोसोबत लफडे! नानमुखाच्या दिवशी नवरदेवाचा नवरीच्या घरात राडा; हळद लागलेल्या नवरदेवाची पोलिसांनी काढली वरात! मलकापूरातील घटना

 
xv
मलकापूर ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)-  चार महिन्यांपूर्वी त्याचे लग्न ठरले, दोघांचा साखरपुडा झाला..मात्र त्याचे एका दुसऱ्याच्या  बायकोसोबत लफडे सुरू होते. त्या विवाहितेच्या नवऱ्याने नवरीकडील मंडळींना फोन केला. माझ्या बायकोसोबत तुमच्या होणाऱ्या जावयाचे अफेयर आहे असे म्हणत त्याने पुरावा म्हणून  त्याच्या बायकोचे आणि नवरदेवाचे एकत्रित फोटो पाठवले.. लग्नाच्या आदल्या दिवशी अचानक समोर आलेल्या या प्रकाराने  नवरी मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना हादरा बसला..मुलीने होणारा नवऱ्याला फोन करून याचा जाब विचारला..लगेच थोड्या वेळात हळद लागलेला, हातावर मेहंदी काढलेला नवरदेव काही जणांना घेऊन नवरीच्या घरी पोहचला आणि तिथे राडा घातला.. नवऱ्या मुलीचे केस ओढले..मी तुझ्याशी लग्न करत नाही, आपले लग्न तुटले असे म्हणत निघून गेला..घडल्या प्रकाराची तक्रार नवऱ्या मुलीच्या आईने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात दिली. आणि पोलिसांनी लगेच नानमुखाच्या दिवशी लगीनघरातून नवरदेवाची वरात थेट पोलीस ठाण्यात काढली. अमोल गणेश पारेकर ( रा. बोराखेडी, ता. मोताळा) असे अटक करण्यात आलेल्या नवरदेवाचे नाव आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मलकापूर शहरात वृंदावन नगरात राहणाऱ्या एका मुलीचे अमोल पारेकर याच्याशी लग्न ठरले होते. अमोल पारेकर हा गुजरातमधील सुरत येथे रेल्वेत लोको पायलट पदावर कार्यरत आहे. २० मार्च २०२२ ला  मोठ्या थाटामाटात दोघांचा साखरपुडा मुलीच्या कुटुंबीयांनी केला होता. मात्र अमोलच्या चारीत्र्याबद्दल पुसटशी कल्पना वधुपक्षाकडील मंडळीला होता. १ मे रोजी लग्नाची तारीख ठरली होती त्यानुसार लग्नाची पूर्ण तयारी करण्यात आली होती.

दरम्यान ३० एप्रिल रोजी वधुपक्षाकडील मंडळींना गुजरातमधून  एक फोन आला. तुमच्या होणाऱ्या जावयासोबत माझ्या बायकोचे अफेयर आहे असे त्या व्यक्तीने सांगितले. त्यासाठी पुरावा म्हणून "त्या" व्यक्तीने त्याच्या बायकोचे आणि अमोल पारेकरचे फोटो नवऱ्या मुलीच्या मोबाईलवर पाठवले..फोटो पाहून वधुपक्षाकडील मंडळींना हादरा बसला. नवऱ्या मुलीने अमोल पारेकरला फोन करून जाब विचारला. त्याच वेळी बोराखेडी येथे अमोल पारेकरच्या घरी  नानमुखाची तयारी सुरू होती. घरावर मांडव पडला होता. नवरेवाला हळद लागलेली होती..

पोलखोल झाल्याने नवरदेव अमोल पारेकर आणि त्याच्या भावंडांनी मलकापुरातील नवरीचे घर काढून दमदाटी केली. त्याचे एका विवाहितेसोबत अनैतिक संबंध असल्याचे त्याने सर्वांसमोर सांगितले. मी त्या महिलेला सोडू शकत नाही, तुझ्याशी लग्न करत नाही असे म्हणत नवरदेव नवऱ्या मुलीच्या अंगांवर धावून गेला. तिचे केस ओढत तिला धक्काबुक्की केली..आपले लग्न तुटले असे म्हणत ते नवरीच्या घरून निघून गेले. अचानक घडलेल्या या प्रकरणामुळे साऱ्यांनाच धक्का बसला. नवऱ्या मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी नवरेदव अमोल पारेकर याच्यासह त्याच्या कुटुंबातील ११ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्याच दिवशी तातडीने पोलिसांनी नवरदेव अमोल पारेकर याला अटक केली असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे..