नवऱ्याने गर्भवती पत्नीला मारले! गर्भपात झाला; बुलडाण्याच्या लेकीची तक्रार

 
kraim

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  दारू पिऊन पती मारहाण करतो, सासरची मंडळी  शारीरिक आणि मानसिक छळ करते. असा आरोप बुलडाणा येथील तक्रारदार महिलेने केला. गरोदर असताना,पती कडून मारहाण करण्यात आली. त्यामुळे तिचा गर्भपात झाला. दरम्यान महिलेने अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथील पती व सासरच्या मंडळी विरोधात पोलिसात तक्रार अर्ज दिला. त्यावरून ६ जणांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेचा पती तहसीलमध्ये क्लार्क पदावर कार्यरत आहे.

कोणतेही व्यसन संसार उघड्यावर आणण्यास कारणीभूत ठरते. बुलडाणा येथील नेहा वैभव जोहरे या पीडित महिलेने तक्रार दिली की, अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथे वैभव फुलचंद जोहरे याच्यासोबत १५ मार्च २०२० रोजी लग्न झाले. तिला एक मुलगी आहे.वैभव तहसील मध्ये क्लार्क म्हणून नोकरी करतो. त्याला दारूचे व्यसन आहे.

तो सतत तिला मारहाण करीत असतो.१८ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी चार वाजता पतीने मारहाण केली त्यामुळे गर्भपात झाला. सासू जिजाबाई जोहर, आनंद पूजा चिंचोले रा. चिखली त्यांनी सुद्धा शारीरिक व मानसिक त्रास दिला. दीपिका, ज्योती, रेखा यांनी सुद्धा स्वयंपाक करता येत नाही, घरकाम करता येत नाही,वडिलांनी अंदनात भांडे दिले नाही असे म्हणत मानसिक छळ केल्याचे पिडीतेने पोलीस तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे बुलडाणा पोलिसांनी आरोपी पती वैभव फुलचंद जोहरे, सासू जिजाबाई फुलचंद जोहरे, ननंद पूजा चिंचोले रा. चिखली, रेखा शिंगणे रा. देऊळगाव राजा, दीपिका चांदोरे रा.संग्रामपूर, ज्योती शिपे रा. औरंगाबाद या ६ जणांविरुद्ध ४९८,४,३२३,३४ भांदवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.