नवरा राक्षसासारखा करतो! त्याला फक्त "तेच" पाहिजे! शेगावच्या विवाहितेची पोलिसांत तक्रार! ५ महिन्यांतच प्रेमविवाह कसा फसला ते वाचाच...

 
kraim
शेगाव(ज्ञानेश्वर ताकोते: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वर्षभरापूर्वी आळंदी येथे त्यांचा प्रेमविवाह झाला. ती ५० टक्के दिव्यांग असूनही त्याने तिला स्वीकारले त्यामुळे आपला नवरा खूपच गुणी आणि मोठ्या मनाचा असल्याचे तिला वाटायचे. पण लग्नाची नवी नवलाई संपली अन त्याच्या खऱ्या - खुऱ्या रूपाचे दर्शन तिला झाले. आता नवरा अगदी राक्षसासारखा करतो, हिंसक बनवतो, त्याने माझ्या जीवनाला नरक बनवले अशी तक्रार देण्याची वेळ विवाहितेवर आलीय.शेगाव शहर पोलिस  ठाण्यात तशी तक्रार देण्यात आली आहे.

सौ.रेणुका आकाश भालेराव या विवाहितेने याप्रकरणाची तक्रार दिली. गेल्या वर्षी जुलै महिन्यात आळंदी देवाची येथे तिचा आणि अकोटच्या काँग्रेस नगरातील राहणाऱ्या आकाश विजय भालेराव यांचा प्रेमविवाह झाला. लग्नात ५ लाख हुंडा, दागिने, घरघुती वस्तू दिल्या होत्या मात्र नवरा आकाश च्या घरचे त्यात समाधानी नव्हते असे तक्रारीत म्हटले आहे. नवरा आकाश लग्नानंतर दारू पिऊ लागला. त्यानंतर तो हिंसक व्हायचा, बायकोवर थुकायचा आणि तिचे जीवन नरक बनवायचा असेही तिने तक्रारीत म्हटले आहे.
   
  दारू पिल्यानंतर तो त्याचे नियंत्रण गमावतो आणि राक्षसाकरतो करतो असेही तक्रारीत म्हटले आहे. माहेरवरून ५ लाख आणण्यासाठी त्याने तिच्याभोवती तगादा लावला. तिच्याशी तो हिंसक पणे वागून तिच्याशी अत्याचार करू लागला. त्या व्यापारी प्रवृत्तीचा असल्याने त्याला फक्त पैसेच पाहिजे होते. तो माझी कोणतीच काळजी घेत नव्हता असा दावाही पीडित विवाहितेने केला आहे. ७ डिसेंबर २०२१ म्हणजेच अवघ्या ५ महिन्यांत सासरच्या लोकांनी मारहाण करून तिला घराबाहेर हाकलून लावले तेव्हापासून ती माहेरी आहे. नवऱ्याच्या व सासरच्या लोकांच्या वागणुकीत कोणताही बदल होत असल्याने तिने शेगाव शहर पोलिस ठाण्यात काल, तक्रार दिली. तक्रारीवरून पती आकाशसह सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.