हातपंपावर पाणी भरायला आलेल्या मुलीला घरात ओढले! तिघांनी केला सामूहिक बलात्कार! दोन वर्षे उपभोग घेऊन प्रेग्नेंट केले! आता तिघेही आयुष्यभर जेलमध्ये सडणार! जळगाव जामोद तालुक्यातील घटना

पिडीत १६ वर्षीय मुलगी गावातील हातपंपावर पाणी भरण्यासाठी गेली असताना गणेश तायडे याने तिचा हात धरून तिला घरात ओढले. त्याचवळेस घरात अरुण तायडे आणि अर्जुन तायडे हजर होते. तिघांनी संगनमताने आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. घडला प्रकार कुणाला सांगितल्यास तिला जीवाने मारून टाकण्याची धमकी दिली.
दोन वर्ष घेतला उपभोग..
दरम्यान पहिल्या प्रयत्नात यश आल्यानंतर तिघा नराधमांची हिम्मत वाढली. तब्बल दोन वर्ष वेळोवेळी ते तिच्या शरीराचा उपभोग घेत होते. दरम्यान पीडितेच्या आईने पीडितेला तिच्या मासिक पाळीबद्दल विचारले असता तिने घडलेला घटनाक्रम सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पिडीत मुलीची वैद्यकीय तपासणी केली असून मुलगी गर्भवती असल्याचे समोर आले. १ मे २०१७ रोजी पीडित मुलीने शासकीय रुग्णालयात बाळाला जन्म दिला..
डीएनए टेस्ट वरून सगळच समोर आल..
तिघा आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी बाळाचे, पिडीतेचे आरोपींचे डी .एन. ए चाचणीसाठी रक्त नमुने घेतले. नागपूर येथील प्रयोगशाळेत ते तपासणीसाठी पाठविण्यात आल्यानंतर आरोपी अर्जुन तायडे याचा अहवाल पॉझिटिव आला. तपासाअंती प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले. सरकारी पक्षाने ११ साक्षीदार तपासले. आरोप सिद्ध झाल्याने न्यायाधीश श्रीमती ए. एस. वैराळकर यांनी तिघाही आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी २० हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली.