गावच्या पोलीस पाटलावरही जळक्यांची वाईट नजर;पोलीस पाटलाच्या सोयाबीन सुडीला आगलाव्यांनी लावली आग! बुलडाणा तालुक्यातील माळविहीरची घटना

 
sudi
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आगलावे कधी कुठे आग लावतील याचा नेम नाही. हल्ली जिल्ह्यात आगल्याव्यांची मोठी संख्या वाढली आहे. कुणाची सोयाबीन चांगली जमली, उत्पादन चांगले होण्याचा अंदाज असला की आगलाव्यांच्या पोटात दुखते, स्वतः मेहनत तर करायची नाही मात्र दुसऱ्याचे चांगले बघवत नाही अशी आगलाव्यांची वृत्ती असते. बुलडाणा जवळील माळविहिर च्या पोलीस पाटलांवर सुद्धा आगलाव्यांचा प्रकोप झाला.

त्याचे झाले असे की पोलीस पाटील देविदास संपत आडवे यांनी त्यांच्या दीड एकर  शेतातील सोयाबीन सांगून त्याची सुडी लावली होती. उत्पादन चांगले होण्याची त्यांना अपेक्षा होती. एकरी जवळपास १५ क्विंटल सोयाबीन होईलच असे शेजार पाजराचे शेतकरी म्हणत होते.दरम्यान २४ ऑक्टोबरच्या रात्री अज्ञात आगलाव्यांनी सोयाबीन सुडीला आग लावली. बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.