बाथरूम मध्ये घुसून दिव्यांग मुलीची इज्जत लुटली! वर्षभरात न्यायालयाने शिकवला धडा! आता आयुष्यभर भोगावी लागणार पापाची फळे! देऊळगावराजा तालुक्यातील निमगाव गुरू गावचा आहे "पापी"!

 
kraim
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दिव्यांग मुलीच्या घरातील बाथरूम मध्ये घुसून तिची इज्जत लुटणाऱ्या नराधम आरोपीला बुलडाणा न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. गेल्या वर्षी जुलै महिन्यात देऊळगाव राजा तालुक्यातील एका गावात  ही घटना घडली होती. देऊळगावराजा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिलीप संपतराव भालेराव( रा. निमगाव गुरू) असे नराधम आरोपीचे नाव आहे.

गेल्या वर्षी १८ जुलै २०२२ या दिवशी ही घटना घडली होती. घटनेच्या दिवशी पीडित २१ वर्षीय तरुणीची आई मजुरीसाठी शेतात गेलेली होती. पिडीत मुलगी १०० टक्के दिव्यांग असल्याने त्याचा फायदा नराधम आरोपीने घेतला. मुलीच्या घरच्या बाथरूम मध्ये घुसून त्याने तिची इज्जत लुटली. ही बाब गल्लीत उपस्थित काही महिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही माहिती मुलीच्या आईला दिली.

त्यामुळे तातडीने मुलीची आई शेतातून घरी आली. त्यावेळी आरोपी मुलीवर अत्याचार करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपी झटका मारून पळून गेला. दुसऱ्या दिवशी देऊळगावराजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले.  पोलिसांनी न्यायालयात दोषारोपत्र दाखल केल्यानंतर न्यायालयाने एकूण ११ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, मानसोपचार तज्ञ, तपास अधिकारी, यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. पिडीत १०० टक्के दिव्यांग असल्याने  तिचा जबाब नोंदविण्यात आला नाही.
 
 नातेवाईक महिला झाल्या फितूर..! 
 दरम्यान ही घटना प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्या पीडित मुलीच्या नातेवाईक महिला साक्ष देतांना फितूर झाल्या. मात्र पीडितेची आई, वैद्यकीय अहवाल व संबधित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षी या विश्वासार्ह ठरल्याने तसेच सरकारी वकील ॲड सोनाली सावजी देशपांडे यांनी अतिशय प्रभावीपणे युक्तिवाद केला. त्यामुळे आरोपीवरील आरोप सिद्ध झाल्याने जिल्हा न्यायाधीश श्री.आर.एन.मेहरे यांनी आरोपीला मरेपर्यंत सश्रम करावास व १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.