नदीला अचानक आलेल्या पुरामुळे मासे पकडायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू! देऊळगाव साकर्षा येथील उतावळी धरणात सापडला मृतदेह..!!

 
gyjh
मेहकर(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नदीला अचानक आलेल्या पुरामुळे मासेमारी करणाऱ्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. आज, १८ सप्टेंबर रोजी तरुणाचा उतावळी धरणात मृतदेह सापडला. जानेफळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुनील रामदास कुकडे (४०, रा. देऊळगाव साकर्षा, ता मेहकर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो मासे पकडण्यासाठी लेंडी नदीपात्रात गेला होता. मात्र नदीला अचानक पुर आल्याने पाण्यात पाहून जात त्याचा मृत्यू झाला. आज त्याचा मृतदेह  उतावळी सापडला. जानेफळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी जानेफळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.